कोनवडे,ता.भुदरगड येथील शिवभवानी दूध संस्था निवडणूक बिनविरोध…

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोनवडे ता.भुदरगड येथील श्री .शिवभवानी दूध संस्था कोनवडे या संस्थेची पंचवार्षिक निवडणूक जयहिंद सहकार
समूहाचे संस्थापक व को.जि.मा.शि.चे संचालक प्रा .हिंदुराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध पार पडली .
11जागांसाठी 10 अर्ज दाखल झालेने निवडणूक निर्णय अधिकारी श्री.कुलकर्णी यांनी या संस्थेची निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहीर केले . कूर पंचक्रोशीत ही संस्था दूधसंकलन तसेच दूध – दरफरक देण्यात अग्रेसर आहे. कष्टकरी, शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे योग्य दाम मिळाले पाहिजे यासाठी संचालक मंडळ काटकसरीचा कारभार करीत असल्याचे संस्थापक चेअरमन प्रा . एच .आर .पाटील यांनी सांगितले, तसेच यापुढेही नेटक्या व्यवस्थापनाच्या बळावर दूध उत्पादकांच्या आर्थिक प्रगतीसाठी हरियाणा या राज्यातून जातीवंत म्हैशी खरेदी करुन दूध संकलनात आणखी भर घालण्याचा मानस असल्याचे त्यांनी जाहीर केले .
बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे आहेत . – प्रा .हिंदुराव रामचंद्र पाटील ( H .R .),एकनाथ विष्णू पाटील, सुनील आनंदा पाटील ,तानाजी शंकर पाटील, राहुल पांडुरंग पाटील, सचिन श्रीपती पाटील,सुनिल बाजीराव गुरव ,सोनाबाई तुकाराम पाटील, राधाताई तानाजी पाटील,कृष्णात रामा कांबळे यांचेसह यावेळी प्रमुख उपस्थित पी.आय.पाटील, तुकाराम दत्तू पाटील , शामराव नाना पाटील,धनाजी श्रीपती पाटील,तानाजी गोविंद पाटील, रघुनाथ केरबा , सातापा चव्हाण,कृष्णात मा.पाटील, संजय बाजीराव पाटील ,सर्जेराव पाटील, विवेक पाटील ,तानाजी राजिगरे,दत्तात्रय पाटील, अक्षय पाटील ,रविंद्र पाटील, स्वप्निल संजय पाटील , अमेय पाटील तसेच सचिव दयानंद पाटील आदीसह समूहातील दूध उत्पादक सभासद उपस्थित होते.