उंबरवाडी येथील शेतकऱ्याची मुलगी झाली डॉक्टर

नेसरी
उंबरवाडी ता.गडहिग्लज येथील शेतकरी व ऊसतोडमजुर बाळु उर्फ तातोबा गोरुले यांची कन्या कु.दीपाली गोरुले हीने प्रतिकुल परीस्थीतीवर मात करत बी ए एम एस (डॉक्टर) ही पदवी मिळवुन मुलीला डॉक्टर करण्याचे स्वप्न ऊराशी बाळगलेल्या वडिलांची स्वप्नपुर्ती केली तीचे वडिल बाळु गोरुले हे ऊसतोडमजुरी व शेतमजुरी करतात त्यांची घरची परीस्थीती हलाकीची जेमतेम दीड एकर जिरायत जमिन असलेलं कुटुंब त्यांची पत्नी सौ. माया गोरुले यांच्या साथीने व आई श्रीमती शांताबाई गोरुले व लहान भाऊ विठ्ठल गोरुले यांच्या मदतीने प्रचंड परिश्रम घेतले मुलिच्या शिक्षणासाठी हाताला जे काम मिळेल ते त्यांनी केले व मुलीचे शिक्षण पुर्ण केले त्यानंतर मुलीची पुढील उच्च शिक्षणासाठी जाण्याची तिव्र इच्छा होती परंतु परीस्थीती मुळे काहींजण मुलिच्या लग्नाचा विचार डोक्यात घालत होते परंतु मुलीला परीक्षेत मिळालेले चांगले गुण व मुलीची उच्च शिक्षणासाठी जाण्याची तिव्र भावना ओळखत पुढील BAMS या शिक्षणासाठी घालणेचे ठरवले आणि *रुरल इनस्टिटुट अॉफ आयुर्वेद रिसर्च सेंटर हॉस्पीटल विद्यागिरी ,मायानी ता.खटाव जि.सातारा* या कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जिद्द व चिकाटी च्या जोरावर वडिलांच्या हिमालयासारख्या साथीने तिने पदवी मिळवुन वडिलांची स्वप्नपुर्ती केली आशा या परीस्थीतीची जाणीव आसलेल्या मुलीचे व तीला खंबीरपणे साथ देणाऱ्या तिच्या कुटुंबियांचे उंबरवाडी व परीसरात कौतुक होत आहे तिच्या या यशात आई सौ माया,वडील तातोबा,भाऊ डॉ अनिल,आजी श्रीमती शांताबाई,व श्रीमती सखुबाई यांचे योगदान लाभल्याचे सांगितले
याप्रसंगी उंबरवाडी व महागाव ग्रामस्थांकडुन शाल,श्रीफळ व पुष्पगुच्छ देवुन अभिनंदन करण्यात आले यावेळी महागाव ग्रा.पं.सदस्य फिरोज सोलापुरे,भाऊसो पडवळे,प्रशांत पाटील,शंकर कांबळे,यल्लाप्पा खणदाळे,गंगाराम भंडे,चंद्रकांत तेली,नरसिंह गुरव,युवराज शिंदे,रोशन वंटमुरी,संतोष सुरंगे,साहिल हावळे इ उपस्थित होते .
शेवटी जिद्द व प्रचंड संघर्षाच्या सिमा पार करत मुलीला डॉक्टर करण्याच उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर सत्यात उतरले माझ्या या संघर्षाला मुलीनं चांगली साथ देत आखेर स्वप्न पुर्ण केले आशा शब्दात मुलिच्या वडिलांनी समाधान व्यक्त केले
मुलीने सत्काराला संबोधताना म्हटले या सन्मानाने मी भारावुन गेले असाच आशिर्वाद राहुदे गोरगरीब रुग्णांची सेवा करणार असे उदगार काढले