ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘शाहू’च्या शैक्षणिक शिष्यवृत्तीतून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप : सुहासिनीदेवी घाटगे

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

शाहू साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची मुले उच्च शिक्षण घेत आहेत.त्यातून ती करिअर करत आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या पाठीवर शाहू साखर कारखान्याने शिष्यवृत्तीच्या माध्यमातून कौतुकाची थाप दिली आहे. असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.

शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ या वर्षातील शैक्षणिक शिष्यवृत्ती वाटप कार्यक्रमवेळी त्या बोलत होत्या .यावेळी २२३सभासदांच्या मुलांना शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वाटप केले.

त्या पुढे म्हणाल्या, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांनी शेतकरी,कर्मचारी केंद्रबिंदू ठेवूनच धोरणे राबविली. त्याचबरोबर त्यांच्या परिवाराचाही सर्वांगीण विकास झाला पाहिजे.हा त्यांच्या कामकाजाचा दृष्टिकोन होता. ३३ वर्षापूर्वी त्यांनी सुरु केलेल्या या योजनेचा लाभ सभासदांच्या ४७९७मुलांना झाला आहे.ग्रामीण भागातील मुलांना शहरातील दर्जाच्या शैक्षणिक सुविधा मिळाव्यात. यासाठी त्यांनी कारखाना शिक्षण संकुल, वसतिगृह काढले. त्यानंतर राजे समरजितसिंह घाटगे व सौ. नवोदिता घाटगे यांनी त्यामध्ये भर घालून स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र,राजे विक्रमसिंह घाटगे अकॅडमी ही सुद्धा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय व्हावी. या उद्देशाने सुरू केली आहे.याचा फायदा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना होत आहे.

स्वागत फायनान्स मॅनेजर आर .एस. पाटील यांनी केले. आभार संचालक युवराज पाटील यांनी मानले.

व्यासपीठावर उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, सर्व संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण आदी उपस्थित होते.

‘शाहू’चे शिष्यवृत्तीधारक१२विद्यार्थी परदेशात…..

शाहू साखर कारखान्याचे शिष्यवृत्तीधारक व कारखाना शाळेत शिकलेले बारा विद्यार्थी नोकरीसाठी परदेशात आहेत.तर शेकडो विद्यार्थी भारतात वेगवेगळ्या क्षेत्रात उच्चपदावर कार्यरत आहेत.शिष्यवृत्तीमध्ये मुलींचे प्रमाण जादा आहे.त्यांना प्रोत्साहन म्हणून ५०० रुपये जादा देण्यात येत आहे.ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब आहे.असे प्रतिपादन यावेळी श्रीमती घाटगे यांनी केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks