ताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीला धक्का ! नवाब मलिक, अनिल देशमुखांना मतदानाची परवानगी नाकारली

टीम ऑनलाईन :

राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी (दि.१०) मतदान होत आहे. दरम्यान, मनी लॉड्रींग प्रकरणी अटकेत असणारे राष्ट्रवादीचे माजी मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मतदान करण्यास परवानगी नाकारण्यात आली. याबाबतचा निर्णय मुंबईच्या विशेष पीएमएलए न्यायालयाने आज दिला. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

विशेष पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांचे उद्या होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान करण्याची परवानगी मागणारे अर्ज फेटाळून लावले आहेत. दोघांनाही परवानगी नाकारल्याने महाविकास आघाडीची दोन मते कमी पडणार आहेत.

दरम्यान, राज्यसभेच्या ६ जागांसाठी शुक्रवारी मतदान होणार असताना मंगळवारी महाविकास आघाडीने शक्तिप्रदर्शन केले. हॉटेल ट्रायडेंटमध्ये झालेल्या बैठकीला शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांबरोबरच महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे अपक्ष आणि छोट्या पक्षांचे 13 आमदार हजर होते. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी चारही जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks