ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कागल तालुक्यातील निढोरी येथे विधवा प्रथा बंदीचा ग्रामपंचायती कडून ठराव

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
निढोरी (ता. कागल) ग्रामपंचायतीने क्रांतीकारी व पुरोगामी विचारातून अनिष्ट प्रथेविरुद्ध ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करत विधवा प्रथेला तिलांजली दिली. शासनाच्या ग्रामविकास मंत्रालयाने विधवा प्रथा बंद असा कायदा करावा, असे परिपत्रक काढले आहे.
या सरकारी आदेशानुसार अनिष्ट प्रथा बंद करण्याचा ठराव केला. ठराव ग्रामसेवक आर. के. पाटील यांनी वाचून दाखवला. सविता • हिंदुराव चौगले यांनी ठराव मांडला तर प्रेरणा बाजीराव यांनी अनुमोदन दिले. यावेळी अध्यक्षस्थानी सरपंच अमित पाटील होते. यावेळी उपसरपंच सविता चौगुले, देवानंद पाटील, केशव पाटील, रंगराव रंडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.