ताज्या बातम्या

प्रसिद्धी पत्रक दि.04/06/2022

नवी पोलीस भरतीची पद्धत ग्रामीण उमेदवारावर अन्याय करणारी मा.मुसाभाई मुल्ला जिल्हाध्यक्ष कोल्हापूर पुरोगामी संघर्ष परिषद

कोल्हापूर:-

(दि.-४ जून)

2019 च्या अगोदर पोलीस भरतीची जी पद्धत होती त्यामध्ये 100 गुणांची मैदानी परीक्षा अगोदर घेतली जायची व नंतर 50 गुणांची लेखी परीक्षा घेतली जायची परंतु 2019 नंतर पोलीस भरतीची जी पद्धत आणली त्यामध्ये अगोदर 100 मार्कची लेखी परीक्षा घेतली जाते व नंतर 100 मार्कची मैदानी परीक्षा घेतली जाते.

    त्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केंद्र ग्रामीण भागात उपलब्ध नसल्यामुळे शहरी भागातील विद्यार्थी आशा मार्गदर्शना मध्ये असतात त्यामुळे त्यांची निवड लेखी मध्ये झाल्यामुळे ग्रामीण भागातील उमेदवार मैदानी परीक्षेत सक्षम व पात्र असून सुद्धा लेखी परीक्षा अगोदर घेतल्यामुळे तो आपोआप पहिल्याच फेरीमध्ये बाहेर फेकला जातो.

    त्यामुळे नवीन आणलेली पद्धत ही ग्रामीण भागातील उमेदवारावर अन्याय करणारी असून ही नवीन पद्धत बंद करून पूर्वीचीच पोलीस भरतीची पद्धत चालू करावी म्हणजे ग्रामीण भागातील उमेदवार मैदानी परीक्षेमध्ये पात्र ठरून लेखी साठी प्रयत्न करतील अशी मागणी पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूरपूर जिल्हाध्यक्ष मुसा भाई मुल्ला यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.

प्रसिद्धीपत्रकात पुढे मुसा भाई मुल्ला म्हणाले की,जर पूर्वीप्रमाणे पोलीस भरतीची पद्धत चालू नाही केली तर पुरोगामी संघर्ष परिषद राष्ट्रीय संस्थापक-अध्यक्ष प्रा.सुभाष वायदंडे यांचे आदेशानुसार प्रत्येक जिल्ह्यामध्ये जिथे जिथे पोलीस भरतीचे केंद्र असेल त्याठिकाणी जाऊन निदर्शनं करून पोलीस भरती बंद पाडणार आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks