ताज्या बातम्या

नॅशनल ड्रॅगन बोटिंगच्या स्पर्धेत मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुडच्या आरती जाधव, श्रृती चौगुले यशस्वी कामगिरी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मध्यप्रदेशातील भोपाळ येथे झालेल्या दहाव्या नॅशनल ड्रॅगन बोटिंगच्या स्पर्धेत

येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड येथील आरती जाधव व श्रृती चौगले या दोघांनी चांगली कामगिरी करुन पदकांची लयलूट केली आहे. 

    कु.आरती प्रवीण जाधव हिने 2 सुवर्ण, 3 रजत, व 1 कास्य पदक पटकावले. तर श्रुती चौगुले ने 3 गोल्ड, 2 रजत, व एक कास्यपदक पटकावले. दोघींनी मिळून 12 पदके प्राप्त केले आहेत सदरची पदके 2 कि.मी‌. व 1 कि.मी. असे वेगवेगळे आंतर पार पाडत सदर चॅम्पियनशिप क्रिडा प्रकारात मिळवली आहेत. या दोघीही बारावी कला शाखेत शिक्षण घेत आहेत. 

      त्यांना या कामी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई, अध्यक्ष श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते दौलतराव देसाई ,प्रशासन अधिकारी मंजिरीताई देसाई मोरे ,कोजिमाशी चे अध्यक्ष बाळ डेळेकर, प्राचार्य एस. आर. पाटील ,उपप्राचार्य एस .पी.पाटील उपमुख्याध्यापक एस. बी. सूर्यवंशी पर्यवेक्षक एस. एच. निर्मळे यांचे प्रोत्साहन तर क्रीडाशिक्षक व्ही .आर .गडकरी, पृथ्वीराज शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks