कोनवडे यमाई विकास सेवा संस्थेवर सत्ताधारी यमाई विकास आघाडीचा झेंडा..

प्रतिनिधी :
कोनवडे ता .भुदरगड येथील श्री.यमाई विकास सेवा संस्थेची निवडणूक मोठ्या चुरशीने पार पडली . या निवडणूकीकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते .यमाई शेतकरी विकास सत्ताधारी आघाडीने माजी सरपंच आनंदराव व्यंकोजी पाटील ,को.जि.मा.शि.चे व तालुका संघाचे संचालक प्रा.हिंदुराव पाटील, डे.सरपंच सुभाष पाटील यांच्या नेतृत्वाखाली आघाडीने विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवत सर्वच्या सर्व १२ जागा मोठ्या फरकाने जिंकल्या. एकूण ३६६ मतदारानी मतदानाचा हक्क बजावला .उच्च न्यायालयीन लढाईत सभासद पात्र-अपात्रेतचा निकाल आधीच सत्ताधारी पॅनेलच्या बाजूने लागला होता .यावेळी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करण्यात आले. विजयानंतर गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.
यावेळी श्री.आनंदराव पाटील यांनी हा विजय अविरत कार्य करणाऱ्या प्रामाणिक कार्यकर्त्यांचा आणि विश्वासू शेतकरी सभासदांचा असल्याचे मत व्यक्त केले तर प्रा .हिंदुराव पाटील यांनी संस्थेचा कारभार सभासदाभिमुख करण्याची ग्वाही नूतन संचालक मंडळांच्या वतीने सभासदाना दिली .विजयी उमेदवार खालीलप्रमाणे सर्वसाधारण गट-आनंदा पाटील,दिनकर दादा पाटील,पंडीत पाटील,बाजीराव पाटील,यशवंत पाटील,शंकर नाना पाटील,प्रकाश शिंदे,रघुनाथ शिंदे
महिला गट- रंजना एकनाथ पाटील व वनिता संजय पाटील
मागासवर्गीय गट-डी. एस.कांबळे
इतर मागासवर्गीय-पंढरीनाथ आनंदराव पाटील यांचेसह माजी सरपंच पांडुरंग पाटील,टी. डी.पाटील,विलास नाना पाटील, एम.एस.पाटील,आनंदा कळमकर,आनंदराव लोकरे,एस.के.पाटील,धोंडीराम शंकर पाटील,पांडुरंग दाजी पाटील यांचेसह सभासद बंधू-भगिनी सत्ताधारी आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.