शाहू कारखान्यात छत्रपती शाहू महाराजांना आदरांजली

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
श्री.छत्रपती शाहू महाराज यांच्या १०० व्या स्मृतिदिननिमित्त श्री.छत्रपती शाहू साखर कारखान्याचे प्रधान कार्यालय श्रीमंत जयसिंगराव घाटगे भवन समोर असणाऱ्या श्री छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्यासमोर १०० सेकंद स्तब्धता पाळून श्री शाहू ग्रुपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली. यावेळी शाहू ग्रुपचे प्रमुख राजे समरजितसिंह घाटगे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी श्रीमंत जयसिंगराव घाटगे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज चे विद्यार्थी ,शिक्षक व शिक्षककेतर कर्मचारी उपस्थित राहून शाहू महाराजांना आदरांजली वाहिली.
यावेळी कर्नाटकचे माजी मंत्री व ज्येष्ठ संचालक वीरकुमार पाटील , व्हाईस चेअरमन अमरसिंह उर्फ बाळ घोरपडे,शाहु चे सर्व संचालक संचालिका , शाहू ग्रुपच्या विविध संस्थांचे पदाधिकारी , सभासद, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह अधिकारी कर्मचारी , परिसरातील नागरिक ,शाहु प्रेमी उस्फुर्त पने मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——-