कोल्हापूर : सीबीएस (स्टॅन्ड) परिसरात शिवशाही बस चा ब्रेक झाला फेल ;प्रवाशी आणि वाहतूकदारांचा उडाला गोंधळ

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती एसटी स्टॅन्ड परिसरात शिवशाही बसचा ब्रेक झाला फेल. ब्रेक फेल झाल्याने अनेक वाहनांना बसने दिली धडक. ब्रेक फेल झाल्याने प्रवासी आणि वाहन धारकांना मध्ये उडाला गोंधळ सुदैवाने कोणतीही दुर्देवी घटना घडलेली नाही. सविस्तर माहिती अशी पुणे कोल्हापूर पणजी ही शिवशाही बस दुपारी 3:20 वाजण्याच्या सुमारास कोल्हापूर स्टॅन्ड येथून पणजीकडे निघाली होती.
महालक्ष्मी चेंबर जवळ बस आली असता काही प्रवासी घेण्यासाठी बस थांबली आणि अचानक बसचा ब्रेक फेल झाला आणि बस मागे मागे सरकू लागली. यावेळी तेथील स्थानिक लोकांनी आणि प्रवाशांनी आरडाओरड चालू केली.
चालकाने प्रसंगावधान दाखवत तेथील एका बंद असलेल्या दुकान गाळ्याला बस धडकवली. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. पण तिथे रस्त्याच्या कडेला उभा केलेल्या दुचाकी आणि फोर व्हीलर गाड्यांचे मोठे नुकसान झालेले आहे.