बंकर तपासणीसाठी आलेल्या कारागृह अधीक्षकांवर कैद्यांने केला हल्ला ; कोल्हापूर कळंबा कारागृहातील प्रकाराने खळबळ

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
कोल्हापूर,जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांने कळंबा कारागृहातील अधीक्षकांवर केला हल्ला.या हल्यात कारागृह अधीक्षक यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.या घटनेने कारागृहात एकच खळबळ उडाली.
कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर हे बंकर तपासणीसाठी गेले असता रत्नागिरीहून कळंबा कारागृहात आणलेल्या कैद्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दबा धरून बसलेल्या कैद्याने त्यांच्यावर हल्ला केला कारागृह अधीक्षक इंदुरकर हे नेहमीप्रमाणे बँकर ची तपासणी करण्यासाठी गेले असता सैलानी त्यांच्यावर पत्र्याच्या तुकड्याने हल्ला केला. यावेळी उपस्थित कर्मचाऱ्यांनी त्यांची सुटका केली. याप्रकरणी जुना राजवाडा पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणार असल्याचे कळंबा कारागृह अधीक्षक चंद्रमणी इंदुरकर यांनी सांगितले.