ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : सरपिराजीराव तलावात बुडुन एकाचा मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी :
मुरगूड येथील सरपिराजीराव तलावाच्या पाण्यात पाय घसरुन पडून बुडून एकाचा मृत्यू झाला चौडेश्वरी हायस्कूल हळदी चे निवृत्त शिक्षकेतर कर्मचारी अशोक शंकर अर्जुने (वय ५९, रा. जवाहर रोड, मुरगूड) असे मयत झालेल्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळच्या सुमारास घडली.
अशोक अर्जुने हे सरपिराजी तलावाकडे फिरण्यासाठी गेले होते. ते फिरुन झाल्यानंतर तलावाच्या पाण्यात हात-पाय धुण्यासाठी गेले होते. त्यावेळी ते पाय घसरुन तलावाच्या पाण्यात पडले. त्यांना पोहता येत नसल्याने त्यांचा तलावात बुडुन मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा विवाहित मुलगी असा परिवार आहे.