कागल : सांगावच्या रघुनाथ पाटलांची ‘राधा’गाय तर पंढरपूरच्या विठ्ठल बिचकुले यांचा ‘सोन्या ‘बैल राजर्षी शाहू पुरस्काराचा मानकरी

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील राजर्षी शाहू कृषी प्रदर्शनातील खिलार जनावरांच्या स्पर्धेत गाय विभागात सांगावच्या रघुनाथ पाटील यांची राधा तर बैल विभागात पंढरपूरच्या विठ्ठल बिचकुले यांचा सोन्या राजर्षी शाहू पुरस्काराचा मानकरी ठरला. नागरिकांनी रविवारचा मुहूर्त साधत तिसऱ्या दिवशी प्रचंड गर्दी केली. विशेषतः महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
श्रीमंत जयसिंगराव घाटगे शिक्षण संकुलच्या मैदानावर हे प्रदर्शन शुक्रवारपासून सुरू झाले आहे. सोमवार ता. २५ पर्यंत चालणार आहे. शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली शाहू ग्रुप, राजे फाउंडेशन तिरुमला ऑइल यांच्या संयुक्त विद्यमाने हे राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन होत आहे.
या स्पर्धेतील इतर विजेत्यांची नावे अनुक्रमे अशीः कंसात गावाचे नाव
आदत गट कालवड विभाग –
महादेव पुजारी (शेटफळ) सुरज गुरव (हुपरी) विभागुन. वेदांत पाटील (नेर्ली) सुजल भोजकर (तळसंदे) विभागून.ऋषिकेश कोळी (गाडेगाव), इंद्रजित पाटील( मौजे सांगाव)
खोंड विभाग –
अक्षय भालेराव (अंकोली) अजित पाटील (वैभववाडी) उमेश आवटे (पिंपळगाव खुर्द)
दोन ते चार दाती गट गाय विभाग-
राजेंद्र चव्हाण (कांडगाव ),दादासो पाटील (चंद्रे) अतुल बाबर (गारडी) विभागून, महादेव आवटे (पिंपळगाव खुर्द), रामा पाटील (तळसंदे)
बैल विभाग –
विठ्ठल बांगर( महिम)श्रीकांत घराळ(सिद्धनेर्ली) आनंदा पाटील (सिद्धनेर्ली) बंडू लोहार (व्हन्नुर) विभागून,
खुला गट – गाय विभाग
बालाजी तारे (पंढरपूर) धीरज फास्के (परिते) दिनकर सोलंकर (तळसंदे)विभागून, संजय जाधव (बानगे) सुजल भोजकर (तळसंदे) विभागून
बैल विभाग –
सागर पाटील (नेर्ली) कालिदास पाटील (तिरवडे )सतीश हांडे (हुपरी)
उत्कृष्ट बैलजोडीसाठीचा पुरस्कार बाबुराव खोत आप्पाचीवाडी यांच्या बैलजोडीला देण्यात आला.
या प्रदर्शनातील राजमाता जिजाऊ महिला समितीच्या स्टॉलवरील बीट, टोमॅटोपासून बनवलेले पापड, विविध प्रकारची घरगुती पद्धतीने तयार केलेली लोणची, चटण्या, मसाले व इतर पदार्थ घेण्यासाठी गर्दी झाली होती. डॉक्टर अंकल या शेती विषयक सल्ला संकल्पनेची शेतकरी उत्स्फूर्तपणे माहिती घेत होते. विविध प्रकारची सेंद्रिय,रासायनिक, द्रवरूप , पाण्यात विरघळणारी खते, औषधे, जिवाणू खते याविषयी चिकित्सकपणे शेतकरी माहिती घेत होते. याशिवाय ट्रॅक्टर, पॉवर टिलर, औषध फवारणीसाठीचा ड्रोन,उसासह इतर पिकात चालणारी विविध अवजारे, फवारणीसाठीचे पंप, विविध कंपनीचे ठिबक सिंचन संच, स्वयंपाक घरात वापरली जाणारी विविध उपकरणे, घरगुती वापराची उपकरणे उपल्बध आहेत.सेंद्रिय गुळ,पावडर,काकवी, कँडी, मध,मधकँडी,मधाचा साबणही प्रदर्शनस्थळी उपल्बध आहे.शेती व विविध प्रकारच्या पीकांविषयीची १२५हून अधिक प्रकारची पुस्तके सवलतीच्या दरात उपल्बध आहेत.
महिलांची लक्षणीय उपस्थिती……….
बामणी ता. कागल येथील तीनशेहून अधिक महिला या प्रदर्शनासाठी एकावेळी खास आरक्षित एसटीच्या गाड्यांमधून आल्या होत्या.राजे बँकेचे अध्यक्ष एम.पी.पाटील यांनी ही महिलांसाठी सोय केली होती.याशिवाय जिल्ह्याच्या कानाकोप-यातून महिला खाजगी वाहनांसह दुचाकीवरून मोठ्या संख्येने आल्या होत्या.त्यामुळे प्रदर्शनस्थळी महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.