बिद्री : दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथे स्थायी समितीच्या वतीने “शिष्यवृत्ती संबंधी बैठक संपन्न”

बिद्री प्रतिनिधी :
दूधसाखर महाविद्यालय बिद्री येथे स्थायी समितीच्या वतीने शिष्यवृत्ती संबंधी बैठक संपन्न झाली त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.संजय डी. पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती ‘जातीचे दाखले व जातपडताळणी’, “शिष्यवृत्ती” या विषयी महा.ई.सेवा.केंद्र बिद्री चे संचालक श्री.अक्षय घोडके यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रा.डॉ.एल.एस.करपे सर यांनी केले.
यावेळी उपस्थित प्रा.डॉ.एच.डी.धायगुडे सर, डॉ.के.आर.सनदी सर, सौ डॉ. रेणुका मेंगाने मॅडम,प्रा.सौ पल्लवी चव्हाण मॅडम, प्रशासकीय कर्मचारी श्री.व्ही.डी.तळेकर, श्री.अर्जुन कांबळे, नंदकुमार पाटील तसेच विद्यार्थी व विद्यार्थीनी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.ए.बी.माने सर व आभार विद्यार्थीनी प्रियांका मोहन जाधव यांनी मानले.