ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मोठी बातमी : राणा दांपत्याला खार पोलिसांकडून अटक ;  ‘हे’ कलम लावले

मुंबई ऑनलाईन :

गेली दोन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेला हनुमान चालिसा पठणाचा हाय व्होलटेज ड्रामा आज शिगेला पोचला. ‘मातोश्री’समोर हनुमान चालिसा पठणाचा इशारा दिला होता. शिवसेनेच्या तक्रारीनंतर त्यांच्यावर खार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर खार पोलिसांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवि राणा यांना पोलिस ठाण्यात नेण्यात आले असून त्यांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर १५३ अ हे कलम लावण्यात आले आहे.

खार पोलिसांनी राणा दांपत्यास त्यांच्या घरी जाऊन त्यांना ठाण्यात येण्याचे आवाहन केले. त्यावेळी राणा दांपत्य आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाली. पोलिस राणा दांपत्यास वारंवार विनंती करत होते. त्यावेळी राणा हे पोलिसांना आमचे अटक वॉरंट दाखवा, असे विचारत होते. त्यामुळे ते पोलिसांसोबत येण्यास तयार नव्हते. पण पोलिसांच्या शिष्टाईला यश आले आणि त्यांना कडेकोट पोलिस बंदोबस्तात राणा यांना त्यांच्या खार येथील घरातून सुरक्षितपणे बाहेर काढले.

खार येथील राणा यांच्या घराबाहेर शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. बाहेर शिवसैनिक हे राणा दांपत्यांनी शिवसेना आणि मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी करत होते. त्यामुळे दोन्ही बाजूंकडून तणावाचे वातावरण बनत चालेले होते. अखेर पोलिसांनी सुरक्षितपणे त्यांना घराबाहेर काढून त्यांना ठाण्यात नेण्यात आले आहे.

तत्पूर्वी राणा कुटुंबीय घराबाहेर पडणार असतील तर पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना जाऊ द्यावे. त्यांना कोणी अडवलं, जाऊ दिलं नाही तर मी स्वतः काही वेळाने खारमध्ये राणा यांच्या घरी जाणार आहे. राणा कुटुंबीयांना घराच्या बाहेर काढणार. बघूया कोण येतंय तिकडे. कोण अडवतंय. मर्द आहात ना? मग या तिकडे. नाही तर त्या अगोदर पोलिसांनी त्यांना घराबाहेर काढावे, असे आव्हान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसैनिकांना दिले होते.

ते म्हणाले की, राणा दांपत्याच्या जिवाला काही बरे वाईट झाले तर राज्य सरकार जबाबदार असणार आहे. बघतो किती वाजेपर्यंत जाऊ देणार नाही ते. मी आता राणांना फोन करणार आहे. मदत पाहिजे असेल तर मी येतो, असे त्यांना सांगणार आहे. राणा दांपत्यांनी माफी मागितली नाही तर आम्ही त्यांना घराबाहेर पडू देणार नाही, हा गुन्हा नाही का. संजय राऊत हे नुसतं बढाया मारतात. मातोश्रीबाहेर २३५ आणि राणांच्या घराबाहेर १३५ शिवसैनिक होते, असा दावाही राणे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला होता.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks