कौलव : मुलाच्या लग्नात आलेला आहेर वृध्दाश्रमास देणगी देऊन केरबा पाटील यांनी जपली सामाजिक बांधीलकी

कौलव प्रतिनिधी :
मुलाच्या लग्नात आलेल्या आहेरची रक्कम वृद्धाश्रमास दान देऊन कौलव येथील केरबा दत्तात्रय पाटील यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्व जनतेसमोर एक आदर्श उभा केला आहे.
कौलव येथील केरबा दत्तात्रय पाटील हे एक सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मले असून त्यांची समाजाप्रती असलेली परोपकाराची वागणूक आदर्श घेण्यासारखी आहे. त्यांचा मुलगा किशोर व सून प्रतिक्षा यांचा विवाह सोहळा दिनांक २१ रोजी कुरुकली येथील श्री सांस्कृतिक हॉल मध्ये पार पडला.
या लग्नास विविध क्षेत्रातील मान्यवर ,नातेवाईक व मित्र परिवार असे १५०० पेक्षा जास्त लोक उपस्थित होते .या विवाह सोहळ्यास त्यांनी कौलव येथील विनायक कुलकर्णी यांना भोगावती येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना जेवणासाठी बोलावण्यास सांगितले होते या आश्रमाचे संस्थापक, तसेच सदस्य ,कर्मचारी व वृद्द महिला आल्यावर त्यांचे यथोचित स्वागत करण्यात आले.
त्यांना विवाहपित्यर्थ पोटभर भोजन देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.या लग्न सोहळ्यास काही नातेवाईक व उपस्थित लोकांनी दिलेली आहेराची पाकिटे केरबा पाटलांनी न स्वीकारता आश्रमाचे तत्कालीन अध्यक्ष विनायक कुलकर्णी यांच्याकडे सुपूर्द केली अशी आहेराची रक्कम रु ६००० व स्वतः ५००० अशी देणगी वृद्धाश्रमास देऊन समाजापुढे एक आदर्श ठेवला आहे.
आपण लग्नकार्यात हजारो लोकांना मिष्टांनाचे जेवण देतो पण निराधार लोकांना दिलेले जेवण हे या हजारो जेवणापेक्षा नक्कीच पुण्याचे कार्य आहे. हे केरबा पाटील यांनी ओळखले.यांचा आदर्श घेऊन समाजातील अनेक लोकानी आपल्या वाढदिवशी,लग्न कार्यात,धार्मिक कार्यात निराधार व भुकेल्या गरजू लोकांना जेवू घातले तर आपल्या देशात एकही मनुष्य भुकेला राहणार नाही. समाजातील प्रत्येक व्यक्तीला कमीत कमी अन्न वस्त्र व निवारा या तीन गोष्टी मिळवून देण्याची जबाबदारी देशातील प्रत्येक नागरिकांवर आहे असे झाले तर आपण समाजाच्या ऋणातून मुक्त होऊ व आपला देश सुजलाम सुफलाम होईल.