सरकारी तिजोरीतून भरला 18 मंत्र्यांचा खासगी रुग्णालयातील उपचाराचा खर्च

टीम ऑनलाईन :
राज्य सरकारमधील 18 मंत्र्यांचा खासगी रुग्णालयातील खर्च सरकारी तिजोरीतून भरल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत एका खासगी मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे.
सविस्तर माहिती अशी की, राज्य सरकारमधील एकूण 18 मंत्र्यांनी करोना काळात खासगी रुग्णालयात उपचार घेतले. त्यांच्या उपचाराचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला. एकूण 1 कोटी 39 लाख रुपयांचा खर्च भरण्यात आला आहे. यात राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नऊ मंत्री, काॅंग्रेसचे सहा आणि शिवसेनेचे तीन मंत्री आहेत.
सरकारी तिजोरीतून उपचार केलेल्या मंत्र्यांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे, ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत, हसन मुश्रीफ, अब्दुल सत्तार, जितेंद्र आव्हाड, छगन भुजबळ, सुनील केदार, जयंत पाटील, सुभाष देसाई, अनिल परब, अशोक चव्हाण, संजय बनसोडे, विजय वडेट्टीवार, के. सी पाडवी, दत्तात्रय भरणे, प्राजक्त तनपुरे, नवाब मलिक यांचा समावेश आहे.
बॉम्बे हॉस्पिटल, लिलावती हॉस्पिटल, ब्रीच कँण्डी हॉस्पिटल, जसलोक हॉस्पिटल, फोर्टिस हॉस्पिटल, अवंती हॉस्पिटल, ग्लोबल हॉस्पिटल, अनिदीप हॉस्पिटल या खासगी रुग्णालयांमध्ये मंत्र्यांनी उपचार घेतले. याचा खर्च सरकारी तिजोरीतून भरण्यात आला.