ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कुरणी नवजीवन सेवा संस्था चेअरमपदी विनोद पाटील तर उपाध्यक्षपदी भारमल

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कुरणी ता. कागल येथील श्री नवजीवन विकास सेवा संस्थेच्या चेअरमनपदी शाहू ग्रुपचे प्रमुख व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे गटाचे विनोद सखाराम पाटील यांची तर व्हाईस चेअरमनपदी सुनील धोंडीरम भारमल यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी निवडणूक निर्णय अधिकारी ए. पी. खामकर होते.स्वागत विजय माने यांनी केले.
यावेळी संचालक आनंदा पाटील, लक्ष्मण जत्राटे, शंकर पाटील, भाऊसो पाटील, रामचंद्र पाटील, संतोष कोरे, बाबुराव कांबळे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव आनंदा कुदळे आभार विष्णू जत्राटे यांनी मानले.