राजे फाऊंडेशन ई लर्निंग सुविधा आणखी शाळांना पुरविणार :श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे ; राजे फाऊंडेशन मार्फत जीवन शिक्षण विद्या मंदिर,मुरगूड शाळा नं.१ मध्ये ई – लर्निंगचा लोकार्पण सोहळा

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
राजे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीची ई लर्निंग सुविधा आणखी शाळांना पुरविणार आहोत.असे प्रतिपादन शाहू साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती सुहासिनीदेवी घाटगे यांनी केले.
राजे फाऊंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शाळांत ई- लर्निंग सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाअंतर्गत मुरगूड ता. कागल येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर,मुरगूड शाळा नं.१ शाळेतील ई-लर्निंग सुविधा लोकार्पणवेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी मा.सौ.मंजुषादेवी रणजितसिंह पाटील होत्या. यावेळी या गुणवंत विद्यार्थ्यांचा,मार्गदर्शक व आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक , यांचा सत्कार केला.
श्रीमती घाटगे पूढे म्हणाल्या,शालेय अभ्यासक्रमासोबत ई लर्निंग सुविधा शिक्षण प्रणालीत अत्यावश्यक झाली आहे. त्याअभावी शाळांमधील होणारी गैरसोय दूर करण्यासाठी राजे समरजितसिंह घाटगे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात आहे.अपुऱ्या शैक्षणिक सुविधा असतानाही शिक्षक चांगल्या दर्जाचे शिक्षण देण्यासाठी मेहनत करतात .त्यामुळे कागल तालुक्याचा शैक्षणिक स्तर उंचावला आहे .शैक्षणिकदृष्ट्या आदर्श कागल घडविण्यासाठी व शैक्षणिकदृष्ट्या अग्रस्थानी येण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व शाळा यांना आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल. असेही त्या म्हणाल्या .
यावेळी केंद्र प्रमुख आनंदा पाटील,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुशांत मांगोरे, यांनी मनोगत व्यक्त केले.व्यासपिठावर माजी नगराध्यक्षा सौ.गौराबाई सोनुले, सौ.रीतामेरी फर्नांडिस सौ.फुलाबाई कांबळे, सौ.शालन चौगले. यांच्यासह ग्रामस्थ,शिक्षक,पालक,विद्यार्थी उपस्थित होते.
स्वागत रवी भोई यांनी केले.आभार विलास पाटील सर यांनी मानले.