ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर : कापुरवाडी येथे अपघातात एकजण ठार

कोल्हापूर प्रतिनिधी :

मोटर सायकलच्या आडवे कुत्रे आल्याने त्याला चुकवण्याच्या नादात मोटर सायकल स्लीप होऊन झालेल्या अपघातात नरंदे इथले सदाशिव बाळासाहेब शेटे वय 40 हे जागीच ठार झाले तर जयकुमार शेटे व 40 हे गंभीर जखमी झाले. हा अपघात आज सकाळी साडेसातच्या दरम्यान कापूरवाडी गावाजवळ झाला.

हातकणंगले तालुक्यातील नरंदे इथले सदाशिव बाळासो शेटे वय 40 आई पत्नी दोन मुली एक मुलगा सह राहत होते. ते शिरोली एमआयडीसीतील मंत्री मेटॅलिक कंपनीत नोकरीस होते. यांचा चुलत भाऊ जय कुमार शेटे वय 40 हाई मंत्री मेटॅलिक कंपनीमध्ये नोकरी करत आहे. नेहमीप्रमाणे त्यांची आज सकाळची ड्यूटी असल्याने हिरो प्लेझर मोटरसायकल गाडी क्रमांक mh 09 dd 56 97 वरुण सकाळी सात वाजता बाहेर पडले होते. ते कापूरवाडी मार्गे जात असताना गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने गाडीचा अपघात झाला

. ते कापूरवाडी मार्गे जात असताना गाडीच्या आडवे कुत्रे आल्याने गाडीचा अपघात झाला. ते दोघेही जोराने डांबरी रस्त्यावर आपटल्याने दोघांच्याही डोक्याला गंभीर दुखापत झाली. डोक्‍याचा चेंदामेंदा झाल्याने सदाशिव जागीच ठार झाले तर जयकुमार शेटे यांच्या डोक्याला इजा झाली असून गंभीर जखमी झाले त्यांना तात्काळ कोल्हापूर येथील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या अपघाताची नोंद पेठ वडगाव पोलिस ठाण्यात झाली असून एकमेव मिळवत्या सदाशिव यांच्या निधनाने शेटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks