ताज्या बातम्याभारतमहाराष्ट्र

मुरगुडच्या नंदिनी साळोखेचा रांचीत झेंडा ; जिंदालची ‘जिंदादील ‘ कुस्तीगीर

मुरगुड प्रतिनिधी :

मुरगुडच्या नंदिनी बाजीराव साळोखे ने वरिष्ठ राष्ट्रीय महिला अजिंक्य पद स्पर्धेत ५० किलो गटात ब्रॉंझ पदक मिळवले.अटीतटीच्या तीन लढतीत तिने प्रथम हरियाणा च्या स्वीटी ला जंकी डावावर १०-६ गुणांच्या फरकाने हरवले .दुसऱ्या फेरीत राजस्थान च्या पायल ला भारंदाज डावावर १० -०० फरकाने आसमान दाखवले
.
उपांत्य फेरीत उत्तरप्रदेशच्या शीतल कडून ६-८ गुणा नी पराभवास सामोरे जावे लागले .त्यामुळे तिला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले .तरीही राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेतील या ग्रामीण मुलीचे कौतुक होत आहे .

जिंदाल ग्रुप ची जिंदादील कुस्तीगीर म्हणून कंपनीने तिचे कौतुक केले .मुरगुड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलाची ती कुस्तीपटू असून वस्ताद दादासाहेब लवटे यांचे प्रशिक्षण तिला लाभले .

खासदार संजय मंडलिक ,वीरेंद्र मंडलिक ,माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर ,प्रशांत अथणी (राज्य कुस्तीगीर परिषद),,चंद्रकांत चव्हाण ,(राज्य समन्वयक,साई).आण्णासो थोरवत इत्यादींचे प्रोत्साहन लाभले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks