निढोरीत डॉ आंबेडकर जयंती निमित्त वक्तृत्व स्पर्धा

मुरगुड प्रतिनिधी :विजय मोरबाळे
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीनिमित्त निढोरी ता कागल येथे खुल्या वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस 3333, द्वितीय बक्षीस2222, तृतीय बक्षीस1111 व उत्तेजनार्थ777 तसेच शिल्लक व प्रशस्तीपत्र देण्यात येणार आहे. तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन स्वर्दा यशस्वी करावी ही विनंती. या *स्पर्धेसाठी पुढील विषय आहेत.*1) शिवशाही ते लोकशाही 2) पुस्तकप्रेमी बाबासाहेब 3) मायेचा आधारवड रमाई 4) विसरत चाललेले बाबासाहेब 5) आजची सामाजिक परिस्थिती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार. मी वक्तृत्व स्पर्धा बुधवार 13/4/2222 रोजी ठीक अकरा वाजता सुरू होणार आहे. स्पर्धेची प्रवेश फी दीडसे रुपये आहे. स्पर्धा सर्व जाती धर्मासाठी खुली आहे. तरी सर्व स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होऊन. स्पर्धा यशस्वी करावी ही विनंती. अधिक माहितीसाठी प्रा. डॉ.प्रदीप कांबळे यांच्या 7219284065 या क्रमांकावर संपर्क साधावा.