ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूरात शरद पवार यांनी घेतला सगळ्या नेत्यांचा समाचार……

कोल्हापूर प्रतिनिधी :

जाती धर्मात तेढ वाढेल, सामाजिक ऐक्य धोक्यात येईल अशी वक्तव्ये भाजपची नेते मंडळी करत आहेत. केंद्रात मोदी सरकार आल्यापासून समाजात द्वेष वाढविण्याचे काम सुरु आहे. केंद्रीय यंत्रणेच्या गैरवापरामुळे जनता नाराज आहे. योग्य वेळी जनता ही नाराजी व्यक्त करेल. सामन्य नागरिकांना दहा वर्षापूर्वी ईडी हा शब्द माहित नव्हता, सध्या ईडीशिवाय दिवसच सुरु होत नाही अशी स्थिती आहे.’असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला.

रविवारी सकाळी कोल्हापूर येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी राज ठाकरेंवर टिका केली , दिल्लीतील मोदी सरकार यांचाही समाचार घेतला. एकरकमी एफआरपी संबंधी पवार म्हणाले, ‘एकरकमी एफआरपी देणे सोपे नाही. साखर विकल्याशिवाय पैसे कुठून येणार. साखर एकदम कधीही विकली जात नाही.’

पवारांची जयश्री जाधवांनी घेतली भेट

कोल्हापूर उत्तरच्या निवडणुकीसंबंधी पवार म्हणाले, ‘ ‘महाविकास आघाडी एकत्रितपणे कोल्हापूरची निवडणूक लढवित आहे. आघाडीत कसलेही मतभेद नाहीत. नागरिकांनी जयश्री जाधव यांना निवडून द्यावे. भाजपवाले विकासकामावर बोलत नाहीत. ते द्वेषाचे राजकारण करतात.’कोल्हापूर उत्तरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी रविवारी सकाळी पवार यांची भेट घेतली.

या पत्रकार परिषदेला ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार के.पी.पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए.वाय.पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर.के.पोवार, राजू लाटकर, आदिल फरास आदी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks