जे पती करू शकतो ते पत्नी करू शकेल का ? महिलांबद्दल मुन्ना महाडिकांचे वादग्रस्त वक्तव्य

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे
काँग्रेस आमदार चंद्रकांत जाधव यांच्या मृत्युमुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाची जागा रिक्त झाली. त्यानंतर आता त्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे. कोल्हापुरात सध्या प्रचारतोफा धडाडत आहेत. भाजपनं सत्यजीत कदम यांना उमदेवारी दिली आहे. आधी भाजपने चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव यांना भाजपकडून लढण्याची ऑफर दिली होती. मात्र त्यांनी ती ऑफर नाकारल्याने भाजपने दुसरा उमेदवार दिला. काँग्रेसने मात्र या जागेवर चंद्रकांत जाधवांच्या पत्नी जयश्री जाधव यांनाच उमेदवारी दिली. आता त्याच उमेदवारीवरून भाजप काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल चढवत आहे. भाजप नेते आणि माजी खासदार धनंजय महाडिक यांचं एक
वक्तव्य सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यांनी महिलांच्या कार्यक्षमतेवर सवाल उपस्थित केल्याचा आरोप सध्या सोशल मीडियातून होतोय.
काय म्हणाले महाडिक
या व्हिडिओत महाडिक म्हणत आहेत, “काँग्रेसचे लोक आता येतील आणि सांगतील एक महिला आम्ही उभा केली आहे. तुम्ही सगळ्या महिला आहेत. ती बिचारी आहे, तिला मतदान करा. पण मला सांगा तुमच्या कुटुंबातील तुमचा पती एखादा प्लंबर असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? तुमचा एकादीचा नवरा इलेक्ट्रीशन असेल तर ते काम उद्या तुम्हाला जमणार आहे का? ज्याचं कामं त्याने करायचं असतंय”, असे म्हणताना महाडिक या व्हिडिओत दिसून येत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.