ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर उत्तरमध्ये महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येऊदे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुंबई येथे सिद्धीविनायकाला विजयासाठी घातले साकडे

प्रतिनिधी :रोहन भिऊंगडे

महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून यावा यासाठी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरात शिवसेना जोरदार कामाला लागली आहे. दरम्यान, क्षीरसागर यांनी मुंबई येथील श्री सिद्धीविनायकाचे दर्शन घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विजयासाठी साकडे घातले. कोल्हापूरात उत्तर विधानसभा पोटनिवडणूक लागली आहे. ही जागा शिवसेनेचा बालेकिल्ला असूनही महाविकास आघाडीने ही जागा काँग्रेसला दिली आहे. उत्तरमध्ये सर्वात दमदार मानले जाणारे शिवसेनेचे नेतृत्व राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रचारामध्ये सक्रीय सहभाग घेतल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवाराला एक वेगळी ताकद मिळाली आहे. नुकतेच अपक्ष उमेदवार हाजी अस्लम सय्यद यांनी आपला उमेदवारी अर्ज राजेश क्षीरसागर यांच्या सांगण्यावरुनच माघारी घेतला. यामुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराला बळ मिळाले. शिवसेनेकडून क्षीरसागर यांनी आपली यंत्रणा कामाला लावली असून 5000 शिवसैनिक मतदारांच्या वैयक्तिक भेटीगाठी, प्रचार रॅली, कार्यकर्त्यांशी संवाद या सर्व पातळीवर आघाडीवर आहेत. दरम्यान, उद्यापासून क्षीरसागर स्वतः मतदारसंघामध्ये ठाण मांडून प्रत्येक ठिकाणी स्वतः लक्ष घालणार आहेत. वैयक्तिक पातळीवर शिवसेनेने त्यांच्या नेतृत्वाखाली वेगळी प्रचार यंत्रणा राबविण्याचे नियोजन केले आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks