ताज्या बातम्यामहाराष्ट्र
उमेश पोवार यांची अनंतशांती संस्थेच्या कार्याध्यक्षपदी निवड

तरसंबळे प्रतिनिधी :
राज्यभर सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या अनंतशांती सामाजिक संस्थेच्या राधानगरी भुदरगड कार्याध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते उमेश पवार यांची नुकतीच निवड करण्यात आली. निवडीचे पत्र अनंतशांती सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष श्याम चौगले, अध्यक्ष सुभाष चौगले यांच्या हस्ते नुकतेच देण्यात आले नुकतेच.
पोवार यांच्या कार्याची दखल घेत ही अनंतशांती संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भगवान गुरव, अध्यक्ष माधुरी खोत, सचिव- अरुणा पाटील,सर्व निवड कार्यकारिणी यांच्या मार्गदर्शनातून करण्यात आली.याप्रसंगी रामचंद्र कांबळे, सुनिल चौगले, कौटुंबिक सदस्य उपस्थित होते.