नायब सुभेदार कुमार कांबळे यांचा बोरवडे ग्रामपंचायतीच्यावतीने सत्कार

बिद्री प्रतिनिधी :
प्रतिकुल परिस्थितिशी संघर्ष करत जवान कुमार कांबळे यांनी सैन्यदलात नायब सुभेदार पदापर्यंत घेतलेली झेप कौतुकास्पद आहे. त्यांचा आदर्श घेऊन तरुणांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत यशस्वी होऊन स्वतःसह गावाचेही नाव उज्वल करावे, असे प्रतिपादन सरपंच गणपतराव फराकटे यांनी केले.
बोरवडे ( ता.कागल ) येथील कुमार रघुनाथ कांबळे यांना सैन्यदलात नायब सुभेदार ( ज्युनिअर कमिशनर ऑफीसर ) पदावर बढती मिळाल्याबद्दल ग्रामपंचायतीच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी सत्काराला उत्तर देताना नायब सुभेदार कुमार कांबळे म्हणाले, माझ्या यशात कुटूंबियांसह ग्रामस्थांचा मोलाचा वाटा आहे. गावकऱ्यांनी केलेल्या सत्काराने मी भारावून गेलो असून हा सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
यावेळी माजी पं.स. सदस्य रघुनाथ कुंभार, ग्रा.पं. सदस्य साताप्पा साठे, पांडुरंग खाडे, राजेंद्र जाधव, प्रकाश सुर्यवंशी,पोलिस पाटील गौतम कांबळे, अशोक कांबळे, दत्तात्रय चांदेकर, मारुती सुर्यवंशी, मारुती फराकटे, साताप्पा चव्हाण, सुभाष साठे, रमेश कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.