ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कोल्हापूर ‘उत्तर’ सह देशातील होऊ घातलेली विधानसभेच्या पोटनिवडणूका न लढवण्याचा ‘आप’चा निर्णय : प्रदेश अध्यक्ष रंगा राचुरे

कोल्हापूर प्रतिनिधी :
देशात पश्चिम बंगाल, बिहार व महाराष्ट्र या राज्यांमध्ये विधानसभा पोटनिवडणूका लागल्या आहेत. या विधानसभा पोटनिवडणूका न लढण्याचा धोरणात्मक निर्णय आम आदमी पार्टीची सर्वोच्च समिती असलेल्या राजकीय व्यवहार समितीने घेतला असून तो राज्य समितीला कळवला आहे.
त्यामुळे महाराष्ट्रातील कोल्हापूर उत्तर विधानसभा निवडणूक आम आदमी पार्टीकडून लढवण्यात येणार नाही. परंतु, राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुका मात्र ताकदीने लढवण्याचा निर्णय राज्य समितीने घेतला असल्याचे प्रदेशाध्यक्ष रंगा राचुरे यांनी सांगितले.