ताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रा. एस. पी. पाटील राज्यस्तरीय आदर्श सेवा सम्मान पुरस्काराने सन्मानित ; अभिनेत्री आशुतोष सुरपुर यांच्या हस्ते मांजरी सांगोला येथे पुरस्कार वितरण

विशेष प्रतिनिधी : विजय मोरबाळे

मुरगूड.विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगूड चे उपप्राचार्य, व दैनिक पुढारी चे जेष्ठ पत्रकार, आदमापूर ता. भुदरगड गावचे रहिवासी प्रा. एस. पी. पाटील (प्रा.शाम पाटील सर) यांना दैनिक तुफान क्रांती चा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक सेवा सम्मान पुरस्कार अभिनेत्री आशु सुरपुर यांच्या हस्ते संपादक मिर्झा गालिब मुजावर यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आला. सदर पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 20मार्च रोजी दैनिक तुफान क्रांती च्या वर्धापनदिनी विविध मान्यवरांच्या उपस्थिती त नक्षत्र मंगल कार्यालय मांजरी ता. सागोला येथे संपन्न झाला.
प्रा. पाटील यांनी केलेल्या शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल व 26 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल हा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व पत्रकार पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानीआमदार शहाजीबापु पाटील, राष्ट्रवादी चे प्रदेश उपाध्यक्ष मा. आमदार दिपक साळुंखे पाटील, सांगोल्याचे तहसीलदार अभिजीत पाटील ,सांगोल्याचे पोलीस निरीक्षक आनंद कुलकर्णी, शंख चे तहसीलदार सुधाकर मागाडे, आंबेजोगाई चे तहसीलदार मिलिंद गायकवाड, शिवशक्ती सेना पक्षाच्या संस्थापक अध्यक्षा करुणाताई धनंजय मुंडे ,शेकापचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब देशमुख ,शेकापचे समिती सदस्य अनिकेत देशमुख, जि प सदस्य अतुल पवार, शहनवाज तांबोळी, चेतन केदार ,नारायण जगताप, उपसंपादक जावेद अख्तर आदी उपस्थित होते

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks