गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र
धक्कादायक : बारावीचा केमिस्ट्रीचा पेपर फुटला
विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.

NIKAL WEB TEAM :
शैक्षणिक
शनिवारी घेण्यात आलेल्या केमिस्ट्रीचा पेपर फुटल्याचं उघड झालंय. या प्रकरणी मालाडच्या खासगी क्लासेसच्या प्रोफेसर मुकेश यादवला अटक करण्यात आली आहे.
विलेपार्ले पोलिसांनी ही कारवाई केली असून, व्हॉट्सअॅप चॅटवरून पेपरफुटी बाहेर आली आहे. पेपर व्हायरल करणा-या तीन विद्यार्थ्यांनीचीही चौकशी करण्यात आली आहे.
शनिवारी सकाळई १०.३० वाजता सुरू होणार असलेला पेपर विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅपवर फॉरवर्ड झाला. विले पार्ले पोलिसांनी याप्रकरणी यादव नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतलंय.
विले पार्लेतील साठे महाविद्यालयात एक विद्यार्थीनी उशीराने आल्याने तिच्या चौकशी दरम्यान हा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय.