ताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकारच्या योजनांसाठी नेत्यांच्या दारात जावे लागते – समरजितसिंह घाटगे ; शिंदेवाडी येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व ई श्रम कार्ड वाटप संपन्न

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

केंद्र सरकारच्या विविध योजनांमधील लाभार्थ्यांच्या खात्यात थेट पैसे जमा होतात.मात्र राज्य सरकारच्या योजनांसाठी नेत्यांच्या दारात जावे लागते.अशी खोचक टिका शाहू ग्रुपचे अध्यक्ष व भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केली.
शिंदेवाडी  ता कागल  येथे बांधकाम कामगारांना सुरक्षा संच व ई श्रम कार्ड वाटप अशा संयुक्त कार्यक्रमावेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी गॊकुळ दूध संघाचे माजी चेअरमन रणजितसिंह पाटील होते.

राजे समरजितसिंह घाटगे पूढे म्हणाले,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,गृहिणी व समाजातील सर्वच घटकांसाठी कल्याणकारी योजना राबविल्या आहेत. केंद सरकारच्या या योजनांची ऑनलाइन पद्धतीने प्रभावीपणे अंमलबजावणी केली आहे.त्यासाठी कुणाच्या दारात जावे लागत नाही.मात्र राज्य शासनाच्या अनेक योजनांसाठी नेत्यांच्या दारात जावे लागते.तर लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट पैसे जमा होत नाहीत.
अध्यक्षिय मनोगतात श्री.पाटील म्हणाले,कोणतीही सत्ता नसताना राजे समरजितसिंह घाटगे यांनी सर्वसामान्य नागरिक,शेतकरी,महिला समाजातील अशा सर्वच घटकांसाठी ते संपुर्ण जिल्हयात फिरत आहे.राजे बँक व शाहू ग्रुपच्या माध्यमातून अतिशय चांगले काम ते करीत आहेत.

यावेळी शाहू कृषीचे चेअरमन अनंत फर्नांडिस,संचालक रामभाऊ खराडे , सरपंच सौ.रेखाताई माळी , विलास गुरव ,अमर चौगले, विजय राजिगरे,सुशांत मांगोरे,सदाशिव गोधडे, अनिल अर्जुने, राहुल कांबळे, युवराज कांबळे,राहुल खराडे, पी.एन.देसाई , चंद्रकांत पाटील,तानाजी पाटील,शशिकांत पाटील,सुनिल खतकर,बाळासो तापेकर,विलास पाटील,संदिप वाडकर आदी उपस्थित होते.

स्वागत व प्रास्तविक बिद्रीचे माजी व्हा.चेअरमन दत्तामामा खराडे यांनी केले.
आभार संजय चौगले यांनी मानले.

दिलासा मोफत धान्याचा

यावेळी श्री.घाटगे यांनी कोरोना काळात अनेकांचे रोजगार गेले होते.अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरिबांना मोफत धान्य पुरविले.त्यामुळे अशा लोकांना दिलासा मिळाला.असे समरजितसिंह घाटगे यांनी सांगून पंतप्रधान मोदी यांचे कौतुक केले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks