कापशी : नंद्याळ अन्यायकारक घरकुल यादी ची चौकशी करा – प्रदिप करडे यांची मागणी

कापशी प्रतिनिधी :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची 2024 पर्यंत सर्वांना पक्के घर देण्याची योजना आहे पण त्याच्या उलट नंद्याळ ग्रामपंचायत आणि ग्रामसेवक यांचा कारभार पाहावयास मिळत आहे NIC कडून आलेली पात्र यादीत अपात्र करण्याचे काम या प्रशासनाने केले आहे आणि त्यासाठी लागणारी गावसभाच घेतली नाही ती फक्त कागदावरच लावली गेली याची कल्पना चक्क ग्रामपंचायत सदस्यांना देखील नाही त्यात अजब म्हणजे त्या यादीवर हरकती साठी असणारा पं. स.चा 7 दिवसाचाआणि जि प चा 7 दिवसाचा एकूण 14 दिवसाचा अपील पिरियड लपवून ठेवला त्यानंतर शिष्टमंडळाने पंचायत समितीचकडे न्याय मागण्याचा प्रयत्न केला पण तेथील विस्तार अधिकारी आणि बीडीओ यांनी यादी ऑनलाइन केली आहे आता यात मार्ग निघणे कठीण आहे असे बेजबाबदार उत्तरे दिली म्हणून यातील गरिबांना न्याय मिळण्यासाठी आम्ही लोकलढा उभा करीत आहोत आणि न्यायासाठी 15 मार्च रोजी ग्रामपंचायत समोर उपोषणास बसत आहोत असे सांगितले
सदरची वादग्रस्त यादी ग्रामसेवक यांनी रात्री 10 ला ग्रामपंचायत ऑपरेटर ला बोलावून करायला लावली आणि पाठवली आणि तक्रार झाली असे समजल्यावर आजतागायत रजेवर गेले आणि सगळ्या घडामोडीवर लांबून लक्ष ठेवत नॉट रिचेबल झाले असे सांगण्यात आले
यावेळी उपस्थित आण्णासो आडेकर,युवराज पाटील, सदाशिव खतकर, शंकर ढेंगे, धनाजी ढेकळे व ग्रामस्थ होते