मुरगूडात विश्वकर्मा सुतार-लोहार पतसंस्था सभासद नोंदणीस प्रारंभ

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
येथील नियोजित श्री विश्वकर्मा सुतार -लोहार नागरी सह .पतसंस्थेच्या सभासद नोंदणीचा प्रारंभ करण्यात आला .
येथील श्री विश्वकर्मा सुतार -लोहार सेवाभावी संस्थेत पतसंस्थेच्या सभासद नोंदणी बाबत बैठक झाली . यावेळी प्रातिनिधीक स्वरूपात ९ सभासदांची नोंदणी करण्यात आली . श्री विश्वकर्मा प्रतिमापूजन आनंदराव सुतार, सावर्डे, सावित्रीबाई फुले = अंजना सुतार यांच्या हस्ते झाले . यावेळी दलित मित्र प्रा .डी डी चौगले यांनी केंद्र सरकार ओबीसी आरक्षणावर घाला घालीत आहे . सामाजिक समतेचे रूपांतर राजकीय समतेत तर राजकीय समतेतुन आर्थिक समतेत रूपांतर झाले पाहिजे .सुतार -लोहार समाजासाठीची श्री विश्वकर्मा सुतार -लोहार नागरी सह .पतसंस्थेची स्थापना तालुक्या तील पहिली संस्था ठरली आहे .
यावेळी लालबावटा बांधकाम संघटनेचे तालुकाध्यक्ष कॉ . शिवाजीराव मगदुम यांनी केंद्र सरकार देशात समान नागरी कायदा आणू पहात आहे . त्याऐवजी जमीनी ताब्यात घेवुन फेर वाटप केले पाहिजे . यासाठी समान भूमी कायदा झाला पाहिजे . वाढती महागाई, एफआरपी, पेट्रोल -डिझेल या प्रश्नावर आपण ज्याच्यावर प्रेम करतो त्यातील एकही लोक प्रतिनिधी बोलत नाही .
यावेळी प्रा महादेव सुतार म्हणाले १७ फेब्रुवारी २०१९ मध्ये सेवाभावी संस्था स्थापन केली . त्यातुन सुतार – लोहार समाज एकत्र केला . संस्थेच्या माध्यमातुन विविध उपक्रम राबवले . विश्वकर्मा जयंती, वधुवर सुचक मेळावा,रक्तदान शिबीर, पुरग्रस्तांना मदत, कोविड योद्धा सत्कार, हळदीकुंकु, आरोग्य शिबीर असे उपक्रम राबविले .
समाजाला विविध समस्यातुन सोडविणे व आर्थिक बळकटी मिळवुन देण्यासाठी लोकांच्या आग्रहातून पतसंस्थेच्या स्थापनेचा विचार पुढे आला .
कार्यक्रमास कागल पंचायत समितीच्या माजी सभापती सौ .अंजना सुतार, सुरेखा सुतार, गीता सुतार, प्रियांका सुतार, कल्पना सुतार, वैशाली सुतार, साधना सुतार, भारती सुतार, युवराज सुतार (मुदाळ ), शिवाजीराव सुतार (बानगे ), दत्तात्रय सुतार,दयानंद सुतार (यमगे ), रोहित लोहार (सोनगे ),ओंकार सुतार (भडगाव ),आनंद सुतार , रंगराव सुतार (सावर्डे बु . )मारुती सुतार (दौलतवाडी ), तुकाराम सुतार (केनवडे ),सचिन सुतार (बेलवळे ), सर्जेराव लोहार (खडकेवाडा ) राकेश सुतार , किशोर लोहार , संजय लोहार , संजय सुतार, विशाल सुतार ,शिवाजी लोहार , किसन सुतार ( सर्व मुरगुड )संजय सुतार, युवराज लोहार,सुनील लोहार,सतीश कांडेकर (सर्व कागल ) यांच्यासह सुतार -लोहार समाज बांधव उपस्थित होते .स्वागत, प्रास्ताविक प्रा . महादेव सुतार यांनी केले . सुत्रसंचालन अविनाश चौगले यांनी केले . तर आभार हरीदास सुतार यांनी मानले .