कुडूत्रीच्या सुरेखा कांबळे रणरागिणी पुरस्काराने सन्मानित

कुडूत्री प्रतिनिधी :
कुडूत्री (ता. राधानगरी) येथील सुरेखा दशरथ कांबळे यांना स्पीड न्यूज २४ या चैनलचा रणरागिणी पुरस्कार (२०२२)नुकताच महिला दिनानिमित्त बहाल करण्यात आला.हा पुरस्कार समाजासाठी कार्य करत असलेल्या महिलांना दिला जातो.
समाजकार्याबरोबर त्यांनी शैक्षणिक, सांस्कृतिक, राजकीय, कला, क्रीडा, आदी क्षेत्रात भरीव असे योगदान दिले आहे. स्त्रिया पुढे आल्या पाहिजे यासाठी त्यांनी स्त्री संघटन करत अनेक स्त्रियांच्या पाठीशी खंबीर उभे राहत त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी पुढाकार घेत त्यांनी आपले काम सुरू ठेवले आहे. सध्या त्या कोल्हापूर मध्ये समाजकार्यासाठी कार्यरत आहेत. आपण समाजाचे देणे लागतो या उदात्त भावनेने त्या समाजासाठी उपक्रम व योजना राबवत आहेत. ते उपक्रम आणि योजना निश्चितच समाजासाठी हितावह आहेत.
आदरणीय राजेश लाटकर, सुरमंजिरी लाटकर व आपले पती आणि कुटुंब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा सर्व क्षेत्रातील प्रवास अखंड चालू आहे.त्यांना मिळालेल्या पुरस्कारामुळे त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून कौतुक देखील होत आहे. आपण समाजासाठी नेहमी अग्रेसर राहणार असून समाजसेवेसाठी वाहून घेणार असल्याचे सत्याचा शिलेदारशी बोलताना त्यांनी सांगितले.