आदमापूर गावाला घंटागाडी प्रदान : युवा नेते राहूल देसाई यांचे आदमापूर ग्रापंचायतीने मानले आभार

गारगोटी प्रतिनिधी :
सद्गुरू बाळूमामांचे तिर्थक्षेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदमापूर गावाला कचरा निर्मुलनाचा प्रश्न सतत भेडसावत होता.ही गरज ओळखून या जिल्हा परिषद मतदार संघाच्या जि प सदस्या रेष्मा राहूल देसाई यांच्या फंडातून या आदमापूर गावास आज घंटागाडी प्रदाऩ करण्यात आली. यावेळी बोलताना आदमापूर ग्रामपंचायतीचे सरपंच विजयराव गुरव म्हणाले की, शसन स्तरावर काटकसर सुरू असतनाही आमच्या विनंतीला मान देवून युवा नेते राहूल देसाई यांनी आंम्हास घंटागाडी प्रदान करण्याचा शब्द दिली होता.तो त्यांनी पुर्ण केला मात्र सद्गुरू बाळूमामांचे हे आदमापूर देवस्थान अशा कित्येक घंटागाडी देवू शकते.भक्तांच्या येणाऱ्या निधी, देणगीतून सामाजिक जाणीव ठेवून हे देवस्थान मंडळ या अशा सेवा देवू शकते मात्र त्यांच्या पदाधिकाऱ्याकडे समजसेवेची जाणीव नाही. येणाऱ्या निधीचा योग्य विनियोग केला तर येणारा काळ या आदमापूर तिर्थक्षेत्रासाठी मोठ्या भाग्याचा असेल.यातून येणाऱ्या सर्व भाविक भक्तांना समाधान देणारा असेल अशी प्रतिक्रिया येथील सरपंच विजयराव गुरव यांनी दिली.
ग्रामपंचायत आदमापूर व ग्रामस्थ आदमापूर यांच्या विनंतीवरून गारगोटी जिल्हा परिषद सदस्या रेश्मा राहूल देसाई यांच्या पंधराव्या वित्त आयोगामधून आदमापूर साठी ही घंटा गाडी मिळाली आहे.यासाठी युवा नेते राहुल देसाई यांनी सद्गुरू बाळूमामांचे गाव म्हणून राजकारण विरहित काम करण्याच्या दृष्टीने अत्यंत कमी काळात आमची ही मागणी मान्य केल्याबध्दल सरपंच विजयराव गुरव व त्यांच्या ग्रामपंचायत सदस्यांनी या नेतृत्वाचे मनोमन आभार मानले. येथील जेष्ठ नेते संभाजीराव भोसले व त्यांचे सहकारी यांनीही सहमती दर्शविली व पाठपुरावा केला त्यांचेही विशेष अभिनंदन ग्रामपंचायतीतच्या वतीने करण्यात आल्याची महिती सरपंच विजयराव गुरव यांनी दिली.