तरसंबळे येथे मोफत डोळे तपासणी शिबीरात दीडशे रुग्णांची तपासणी

तरसंबळे प्रतिनिधी :
तरसंबळे (ता.राधानगरी) येथे महाशिवरात्री निमित्त घेण्यात आलेल्या मोफत डोळे तपासणी शिबिरात चांगला प्रतिसाद मिळाला. तरसंबळे परिसरासह दीडशेहून अधिक रुग्णांनी या शिबिरात आपली डोळ्यांची तपासणी करून घेतली.अनेक गरीब आणि गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.
कोल्हापूर येथील ओम हॉस्पिटल यांच्या वतीने नुकतेच मोफत डोळे तपासणी शिबिर संपन्न झाले. यांनी रुग्णांची तपासणी करून रुग्णांना अत्यल्प किंमतीत चष्मे वाटप केले.या शिबिराचे नियोजन महाशिवरात्री उत्सव कमिटी यांच्याकडून करण्यात आले.सकाळी दहा वाजले पासून रुग्णांनी आपली हजेरी लावून या शिबिराचा लाभ घेतला.
दरम्यान दिवसभर ग्रामस्थांनी महाप्रसादाचा लाभ घेतला तर सायंकाळी बुजवडे येथील सोंगी भजनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक पत्रकार शाम चौगले यांनी तर आभार सुभाष चौगले यांनी मानले. यावेळी महाशिवरात्र उत्सव कमिटीचे सर्व सदस्य, ग्रामस्थ व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.