शिष्यवृत्तीत कागल राज्यात प्रथम क्रमांकावर येईल : सभापती जयदिप पोवार यांचा विश्वास

बिद्री प्रतिनिधी :
शिष्यवृत्ती परिक्षेत कागल तालुक्याने आजअखेर घेतलेली झेप कौतुकास्पद असून, पंचायत समितीच्या माध्यमातून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात तसूभर कमी पडणार नाही. शिक्षण विभाग, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी घेतलेले कष्ट पाहता शिष्यवृत्तीत कागल तालुका यंदा राज्यात प्रथम क्रमांकावर येईल, असा विश्वास सभापती जयदिप पोवार यांनी व्यक्त केला.
बिद्री (ता. कागल ) येथील केंद्रशाळेत ना. हसनसो मुश्रीफ फौंडेशन व पंचायत समिती कागल यांच्यावतीने आयोजित केलेल्या शिष्यवृत्ती सराव चाचणी परीक्षेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ग्रा.पं. सदस्य राजेंद्र चौगले, केंद्रप्रमुख विलास पोवार, केंद्रसंचालक वसंत पालकर, केंद्रसमन्वयक तानाजी आसबे, मुख्याध्यापिका आशा पाटील यांच्या हस्ते प्रश्नपत्रिकांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी आर.एस. पाटील, नारायण वारके, श्रीकांत कुंभार, वैशाली भोसले, चंद्रकांत लोकरे यांच्यासह शिक्षक व विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. स्वागत केंद्रप्रमुख विलास पोवार यांनी केले , तर आभार केंद्रसमन्वयक तानाजी आसबे यांनी मानले .