गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

विधवा महिलेला धमकी देणाऱ्या दिर व सासू वर कारवाई करा अन्यथा आंदोलन ; पुरोगामी संघर्ष परिषदेचा इशारा

कोल्हापूर प्रतिनिधी :

येथील विधवा महिला श्रीमती शहनाज बशीर नदाफ याना दीर व सासू यांच्या धमकीमुळे गाव सोडून पाचगाव या ठिकाणी राहावे लागत असून नवर्‍याच्या संपत्तीत हिसा मिळू नये म्हणून पाचगाव या ठिकाणी जाऊन दिराने त्यांना दुसरे लग्न करण्याची धमकी दिल्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने करवीर पोलिस स्टेशनमध्ये न्याय मागितला असून, पोलीस स्टेशनने याची गांभीर्याने दखल घेऊन सदर दीर सिकंदर मीरासो नदाफ व सासू वजीर मिरासो नदाफ यांचेवर ताबडतोब कारवाई करावी अन्यथा पुरोगामी संघर्ष परिषदेच्यावतीने आंदोलन करून त्यांना न्याय मिळवून दिला जाईल असा इशारा पुरोगामी संघर्ष परिषदेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष मुसा(भाई) मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने करवीर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे.
सदर शिष्टमंडळात कोल्हापूर जिल्हा महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा राधा कांबळे, कोल्हापूर जिल्ह्याचे संपर्कप्रमुख दिपक शिंगे, कोल्हापूर शहराध्यक्ष दिलीप कांबळे, अनिकेत् ऊर्फ मंगेश चव्हाण इत्यादी पदाधिकारी होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks