ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रशिया-युक्रेन युद्धावेळी भारताचा दुसरा बळी, आणखी एका विद्यार्थ्याचा मृत्यू

नवी दिल्ली :

रशिया-युक्रेन युद्धादरम्यान आज (२ मार्च) पुन्हा एका भारतीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. चंदन जिंदाल (२२) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. हा विद्यार्थी पंजाबचा रहिवासी होता. चंदन हा युक्रेमधील विनीसिया येथे एमबीबीएसचे शिक्षण घेत होता. तर कालच गोळीबारात एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता.

विन्नित्सिया शहरातील मेमोरियल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा चंदन जिंदल हा विद्यार्थी आजारी पडला होता. त्याच्या डोक्यातून रक्त येत होते. उपचारावेळी त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. चंदनच्या मेंदूला रक्त पुरवठा कमी झाल्याने त्याला खारकीवमधील शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह परत आणण्यासाठी त्याच्या कुटुबियांनी केंद्र सरकारला विनंती केली आहे.

भारतीयांना मायदेशात आणण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न -अनेक भारतीयांना परत आणण्याचा प्रयत्न सुरू आहेत. अनेकजण युक्रेन सोडून आजुबाजुच्या देशात जाण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, काही ठिकाणी त्यांची अडवणूक होत आहे. युक्रेनमध्ये रशियाकडून सतत गोळीबार, बॉम्बहल्ले, मिसाईल हल्ले होत आहेत. यात आतापर्यंत अनेक युक्रेनियन नागरिक मारले गेले आहेत. या युद्धाची मोठी झळ भारतालाही बसत असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks