कोल्हापुर : जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंदर्भात अहवाल तातडीने सादर करा : राजेश क्षीरसागर

कोल्हापूर प्रतिनिधी :
जयप्रभा स्टुडिओच्या जागेसंदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेवून जयप्रभा स्टुडिओच्या खरेदीदारांना पर्यायी जागा देवून स्टुडिओची जागा शासनाच्या ताब्यात घेवून विकसित करावी, अशी मागणी केली होती. याबाबत मंत्री शिंदे यांनी नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना तपासून सादर करण्याचे निर्देश दिले होते. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाचे कक्ष अधिकारी रश्मीकांत इंगोले यांनी कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त यांना तातडीने अहवाल सादर करण्याच्या लेखी सूचना दिल्या आहेत. जनभावनांचा विचार करून स्टुडिओची जागा महानगरपालिका प्रशासनाच्या किंवा शासनाच्या ताब्यात घेण्याबाबत कायदेशीर बाबींची तपासणी करून सकारात्मक अहवाल तातडीने शासनास सादर करावा, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिका प्रशासक कादंबरी बलकवडे यांना दिल्या.