ताज्या बातम्यामहाराष्ट्र

घुडेवाडी येथे रक्तदान शिबिर सोहळ्याला चांगला प्रतिसाद

तरसंबळे प्रतिनिधी : 

जिजाऊ फाउंडेशन घुडेवाडी (ता. राधानगरी )व ग्रामस्थ यांचे वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.या रक्तदान शिबिरात ऐंशिहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान हेच श्रेष्ठदान मानून रक्तदान केले.
दैंनदिन जीवनात रक्ताचा पुरवठा कमी पडू नये आणि व रक्ताचा अपुरा पुरवठा या मुळे कुणाच्याही जीवाला धोका पोहचू नये या उद्देशाने शिवजयंती निमित्त शिवभक्त यांनी एक समाज उपयोगी स्तुत्य उपक्रम राबवला या उपक्रमाला परिसरातून चांगला प्रतिसाद मिळाला.या रक्तदानासाठी नीटनेटके नियोजन करण्यात आले असून रक्तदात्यांना हेल्मेट आणि प्रशस्तीपत्रक देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.यावेळी जिल्हा अध्यक्ष मा.सारंग पाटील उपस्थित होते,त्याच बरोबर करवीर तालुक्याचे युवक अध्यक्ष मा.उदय भाऊ, शिवसेना तालुकाध्यक्ष चंद्रकांत बुगडे, शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन बंडोपंत किरूळकर ( गुरुजी ), माजी सरपंच मा.मारुती बुगडे, भोगावती सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक मा.रावसो बुगडे, बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त कर्मचारी वाय. जी. पवार ,दत्त कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मा.संभाजी किरूळकर, फाउंडेशन तालुकाध्यक्ष विवेक बुगडे, पोलीस पाटील सुशांत बुगडे याच बरोबर शिवाजी कुंभार, अरुण बुगडे सर, सचिन बुगडे, अशोक कुंभार, शिवाजी सरवणे, बळवंत भोसले, सुनील कुंभार, शशिकांत जठार, श्यामराव सरवणे, युवराज बुगडे मंडळाचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी रक्तदान करणार्‍या प्रत्येक रक्तदात्यास देव फाउंडेशन करून प्रशस्तीपत्र आणि हेल्मेट वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार मा.चंद्रकांत बुगडे यांनी मानले

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks