सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध : ए.वाय.पाटील

तरसंबळे प्रतिनिधी : शाम चौगले
के डी सी बॅकेमार्फत सभासदांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण नेहमी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष मा. ए. वाय पाटील यांनी केले ते.मृणाल दूध,संस्था,चिंचमाई विकास, व आमदार शंकर धोंडी माध्यमिक विद्यालय, कंथेवाडी(.ता राधानगरी)यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सेवा संस्थेच्या सर्व नवनियुक्त संचालक व विविध क्षेत्रात निवड व यश सत्कार समारंभ कार्यक्रम तसेच मायक्रो एटीएम उद्घाटन कार्यक्रमात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राजाराम शंकर पाटील होते. कार्यक्रमात ए. वाय.पाटील,प्रा शाम पाटील, सुहानी ऱ्हावळट,सुखदा ऱ्हाटवळ आदींचा सत्कार करण्यात आला.
पाटील पुढे म्हणाले के. डी.सी बँकेमार्फत आपण सभासदांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमीच अग्रेसर राहिलो आहे.या पुढेही कटिबद्ध असणार आहे.आगामी जि.परिषद व पंचायत समिती निवणुकीत सर्वांना एकत्र घेऊन समझोता एक्सप्रेस धावणार असून त्याचे सारर्थ्य आपण करणार असल्याचे त्यांनी सांगितले.तसेच वसंतराव पाटील यांचे कार्य आदर्श असून त्यांच्या पुढील कार्याला यावेळी त्यांनी शुभेच्छा देखील दिल्या.
जनता दलाचे जिल्हाध्यक्ष वसंतराव पाटील म्हणाले, जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्नशील असून ते प्रश्न सोडवण्यासाठी रस्त्यावर उतरण्याची आपली तयारी आहे.आगामी काळात समविचारी पक्षाना एकत्र घेऊन काम करावे अशी मागणी त्यांनी जिल्हाध्यक्ष ए. वाय .पाटील यांचेकडे केली.चांगल्या कार्याला आपलीही साथ असेल अशी ग्वाही पाटील यांनी दिली.कार्यक्रमात राधानगरी तालुका जनता दल अध्यक्ष विठ्ठल मुसळे यांच्यासह आदींनी मनोगते व्यक्त केलीत.
कार्यक्रमास ए. वाय. पाटील, सभापती वंदना पाटील,जनता दल तालुका अध्यक्ष विठ्ठलराव मुसळे,अमरसिंह, संस्था सचिव अभिजित पाटील, पाटील,बंडोपंत किरुळकर,दत्तात्रय पाटील,राजेंद्र कवडे,एकनाथ पाटील,दीपक पाटील, मानसिंग पाटील,,सूर्यकांत देसाई,बी.के.कांबळे,वंदना पाटील,मुख्याध्यापक बी.जी.पाटील,शाम चौगले,सर्व शिक्षक स्टाफ व कर्मचारी, विविध संस्थेचे चेअरमन व्हा. चेअरमन सर्व सभासद ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वागत व प्रास्ताविक प्रदीप पाटील यांनी तर आभार एस. एस.पाटील यांनी तर सूत्रसंचालन मधुकर किरुळकर यांनी केले.