ताज्या बातम्या
दूधसाखर विद्यानिकेतनच्या प्रा. मंजिरी पाटील यांना एम.फिल. प्रदान

बिद्री : प्रकाश पाटील
बिद्री ता.कागल येथील दूधसाखर विद्यानिकेतन व क.महाविद्यालयाकडील जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका सौ. मंजिरी मिथून पाटील यांना शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर कडून एम.फील प्रदान करणेत आली त्यांनी शिक्षणशास्त्र विषयावर उच्च माध्यमिक स्तरावरील जीवशास्त्र विषयातील निवडक घटकांसाठी सहभागी अध्ययन पध्दतीचा वापर एक अभ्यास या विषयावर शोधप्रबंध मे २०१७ ला सादर केला होता.
सौ. पाटील यांना मार्गदर्शिका म्हणून डॉ.गितांजली सर्जेराव पाटील यांचे मार्गदर्शन तर डॉ. मिथून पाटील व मुदाळ शाळा संकूलाचे उपाध्यक्ष एम.एस.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.