ताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेकरिता अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी पर्यंत मुदतवाढ : समाज कल्याण आयुक्त विशाल लोंढे

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

कोविड 19 च्या प्रादुर्भावामुळे सन 2020-21 व 2021-22 या दोन वर्षाच्या शैक्षणिक कालावधीमध्ये संस्था / महाविद्यालये प्रत्यक्ष बंद होती. यामुळे संबंधित विद्यार्थ्यांनी भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा ज्या विद्यार्थ्यांनी स्वतः उपलब्ध करुन घेतल्या आहेत व स्वत:च्या घरी अथवा खोली भाड्याने घेवून ऑनलाईन प्रणालीद्वारे शिक्षण घेतले असेल अशा पात्र विद्यार्थ्यांनी 28 फेब्रुवारी 2022 अखेर समाज कल्याण कार्यालयाकडे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे अवाहन समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे यांनी केले आहे.

अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकांतील 11 वी, 12 वी तसेच इयत्ता 12 वी नंतरच्या व्यवसायिक तसेच बिगर व्यवसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेले जे विद्यार्थी मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास, निर्वाह भत्ता व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्याच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्याकरिता सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागामार्फत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना राबविली जाते.

अधिक माहितीकरिता सहायक आयुक्त, समाजकल्याण कार्यालय, विचारे माळ, बाबर हॉस्पिटल शेजारी, कोल्हापूर येथे ०२३१-२६५१३१८ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks