कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण; कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे देशातील पहिले मोझॅक-3 तंत्रज्ञान असणारे VERSA HD रेडिएशन थेरपी मशीनचे आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते लोकार्पण
वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर रोगाचे निदान करण्यासाठी fluorodeoxyglucose (FDG) manufacturing center मुंबई, पुणे अशा ठिकाणी असून कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सर चे निदान करण्यासाठीचा खर्च न परवडणारा असल्यामुळे हा प्रकल्प कोल्हापूर येथे सुरु व्हावा, तसेच कॅन्सर निदानाचा समावेश महात्मा फुले योजनेत करण्यात यावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली.

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे
कॅन्सर रुग्णांवर सर्वोत्तम उपचार करणारे गोकुळ शिरगाव रोड, कोल्हापूर येथील कोल्हापूर कॅन्सर सेंटर आता अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण होत आहे. कॅन्सर चे अधिक अचूक, जलद आणि प्रभावी उपचार व्हावेत तसेच ग्रामीण रुग्णांनाही तत्पर सेवा मिळावी यासाठी कोल्हापूर कॅन्सर सेंटर येथे देशातील पहिले मोझॅक-3 तंत्रज्ञान असणारे VERSA HD रेडिएशन थेरपी मशीन बसविण्यात आले असून त्याचे लोकार्पण आरोग्यमंत्री ना. राजेश टोपे यांच्या हस्ते करण्यात आले.सर्वसामान्य कॅन्सरग्रस्त रुग्णांना या कॅन्सर सारख्या गंभीर आजारातून दिलासा देण्याचे काम या कॅन्सर हॉस्पिटल ने केले आहे. या कॅन्सर रोगाचे अचूक निदान करणारे रेडिएशन थेरपी मशीन बसविल्या बद्दल डॉ. सुरज पोवार यांचे अभिनंदन केले.
वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सर रोगाचे निदान करण्यासाठी fluorodeoxyglucose (FDG) manufacturing center मुंबई, पुणे अशा ठिकाणी असून कॅन्सरग्रस्त रुग्णांना कॅन्सर चे निदान करण्यासाठीचा खर्च न परवडणारा असल्यामुळे हा प्रकल्प कोल्हापूर येथे सुरु व्हावा, तसेच कॅन्सर निदानाचा समावेश महात्मा फुले योजनेत करण्यात यावा, अशी मागणी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली. या मागणींवर FDG या ३५ कोटीच्या प्रकल्पाला केंद्र व राज्यशासनाकडून चालना मिळण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रकाश आवाडे,आमदार राजेश पाटील, आमदार जयंत आसगावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील, व्ही. बी. पाटील, माजी नगरसेवक आदिल फारस, डॉ. रवींद्र हत्तरकी, डॉ. स्वप्निल हुपरीकर यांच्यासह सर्व डॉक्टर्स, अधिकारी व स्टाफ उपस्थित होते.