ताज्या बातम्यामहाराष्ट्र
प्रा. गणेश महाडिक सेट परीक्षा उत्तीर्ण.

कुडूत्री प्रतिनिधी :
मुसळवाडी (ता राधानगरी )येथील भोगावती महाविद्यालयाचे प्रा. गणेश कृष्णात महाडिक हे नुकतेच सेट परीक्षा उत्तीर्ण झाले. श्री विठ्ठल रुक्मिणी सहकारी दूध संस्थेचे संस्थापक व मुख्य प्रवर्तक असलेले प्रा. महाडिक हे गेली चार वर्षे अध्यापनाचे काम करत असून मराठी विषय घेऊन त्यांनी सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे. याकामी त्यांना भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन जयसिंग हुजरे, व्हाईस चेअरमन सर्जेराव पाटील ,प्राचार्य आर ए.सरनोबत यांचे प्रोत्साहन व समाजशास्त्र विभाग प्रमुख प्रा. आर. जी पाटील, अशोक महाडिक, डॉ. राजेंद्र महाडिक प्रा. दत्तात्रय काटकर ,प्रा. डी एस कांबळे, प्रा. के.आर पाटील ,प्रा टी.जी. पाटील, प्रा. संदीप धामणे यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.