ताज्या बातम्यामहाराष्ट्र
कृषी तंत्र विद्यालय परिते येथे 73 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

परिते प्रतिनिधी :
कृषी तंत्र विद्यालय परिते ता.करवीर जि.कोल्हापूर येथे मंगलमय वातावरणात 73 वा प्रजासत्ताक दिन पार पडला. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी.आर.पाटील, संस्थेचे अध्यक्ष बी.बी जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. सर्वांनी ध्वजाला मानवंदना देऊन राष्ट्रगीत, ध्वजगीत झाले. यावेळी “पर्यावरण वाचवा वसुंधरा जपा”, “पाणी आडवा पाणी जिरवा”,”झाडे लावा झाडे जगवा” हा संदेश विद्यार्थ्यांनी दिला.
यावेळी संस्थेचे विश्वस्त मा.श्री.आप्पासाहेब बळवंत जाधव, कार्यकारी विश्वस्त एन.आर.पाटील, मुख्य प्रशासकीय अधिकारी संतोष पाटील, विनोद खोबरे, दत्तात्रय कांबळे आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व विद्यार्थी उपस्थित होते.