सांगली जिल्ह्यातील ‘या’ गावात ‘गोरखा’ चे हस्ते ध्वजारोहन करून जपण्यात आले सामाजिक ऐक्य.

आष्टा :
आष्टा ता.वाळवा जि.सांगली येथील रायगड नागरी सहकारी पतसंस्थेत प्रजासत्ताक दिनानिमीत्त गोरखा श्री तारासिंग साऊद यांचेहस्ते ध्वजारोहन करून सामाजिक ऐक्य जपण्यात आले.”गोरखा” म्हणजे समाजातला एक दुर्लक्षीत घटक.दिवसा क्वचित दिसनारी ही व्यक्ती अत्यंत तुटपुंज्या मिळकतीवर,जिर्ण झालेल्या ड्रेसमध्ये रात्रभर गावात फिरून इमानेईतबारे आपली सेवा बजावत असते.
आपल्या विशिष्ट आवाजात आणी विशिष्ट शैलीत लहानथोर सर्वांना “सलाम साहब” म्हणून कृतज्ञता व्यक्त करणा-या या गोरख्याच्या लुकलुकणा-या डोळ्यांमधली नेमकी गरज रायगड नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन मा श्री संभाजी सुर्यवंशी(राजे) यांनी अचूक हेरली आणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून गोरखा तारासिंग साऊद यांना नविन ड्रेस आणी मानधन देवून रायगड नागरी सहकारी पतसंस्थेत त्यांच्याहस्ते ध्वजारोहन संप्पन्न केले.
समाजातील दुर्लक्षीत,वंचीत व्यक्तींना आणी त्यांच्या कार्याला प्रकाशझोतात आणून त्यांना योग्य तो न्याय देण्यासाठी रायगड परिवार अविरतपणे प्रयत्न करत राहील असे प्रतिपादन यावेळी मा श्री संभाजी सुर्यवंशी(राजे) यांनी केले.रायगड नागरी सहकारी पतसंस्थेच्या या अनोख्या ध्वजारोहन कार्यक्रमाचे आष्टा पंचक्रोशीत कौतूक होत आहे.
याप्रसंगी रायगड बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा श्री तुषारराजे सुर्यवंशी,रायगड पतसंस्थेचे संचालक मा श्री सुनिल माने(काका),मा श्री लालासो ढोले,मा श्री संदीप पोळ,मा श्री शिवाजी डांगे,मा श्री संजय इटकरकर,मा श्री उदय कवठेकर,मा श्री आप्पासो नायकवडी,मा श्री जयकुमार रुकडे,मा श्री आप्पासो माळी,मा श्री जनार्दन शिंदे,मा श्री प्रकाश पवार,मा श्री संदीप कुडचीकर,मा श्री पुंडलीक बनशंकरी,मा श्री राजवर्धन थोरात,मा श्री उमेश डांगे,संस्थेचा सेवक वर्ग व सभासद उपस्थित होते