गणित प्राविण्य परीक्षेत मुरगुड विद्यालयाचे यश; पाचवीचे 32 तर आठवीचे 17 विद्यार्थी प्रज्ञापात्र

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर यांच्या वतीने घेण्यात आलेल्या गणित प्राविण्य परीक्षा मध्ये येथील मुरगुड विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधील पाचवीचे बत्तीस तर आठवीचे 17 विद्यार्थी प्रज्ञापात्र ठरले आहेत.
यामध्ये राई स्वप्निल शहा, प्राची अमर कांबळे ,मयुरी आनंदा पाटील, श्रेया किरण कुमार गुरव ,शरण्या शैलेश माळवदे, मधुरा स्वप्नील गुरव, श्रावणी सातापा हंचनाळे, श्रावणी रणजीत सुतार ,पुनम नंदकुमार पाटील, श्रेया संतोष शिंपुगडे, सानवी श्रीकांत पाटील, स्वराज संतोष मोरबाळे, वेदांत कृष्णात कांबळे, शर्विल दिपक मेंडके ,आशुतोष रघुनाथ पाटील, सर्वजीत सागर थोरवत, प्रिया अनिल मेखले, दिशा सुनील कांबळे श्रुती प्रमोद पाटील, गायत्री अभिजीत आपटे, श्रुती अनिल सुतार ,श्रद्धा अर्जुन मगदूम, शिवराज रणजीत भरवसे, रुद्र अरुण बाभुळगावकर, विराजसिंग सागर पाटील, सोहम संग्राम लोखंडे ,शिवम मारुती पाटील, अथर्व रघुनाथ बोडके, साईश सातापा गुरव, अविनाश भरत पाटील, साई विनायक जाधव, राजवर्धन रमेश रायजादे या पाचवीच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.
तर श्रद्धा रामचंद्र पाटील, युगंधरा विलास अनुसे, प्रणाली अशोक लोहार, प्रथमेश ज्योतीराम जठार ,अथर्व दिलीप आरडे, नेहा तानाजी गुरव ,धनश्री बाळासो आंगज, पृथ्वी राजाराम जठार ,हर्षद तुळशीदास कुंभार , चिन्मय तानाजी कुंभार ,मंदार तानाजी पाटील, समर्थ दिगंबर सुतार, केतन दयानंद कांबळे ,सुमित सुधीर सावर्डेकर, सुमेध सुधीर सावर्डेकर, सुरज बापू ताटे, आदर्श मुकुंद भोगले या आठवीच विद्यार्थ्यांचा समावेश आहे
या विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव प्रा. जयकुमार देसाई अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत युवा नेते दौलतराव देसाई चेअरमन सौ. लीना सावंत शिक्षक प्रतिनिधी लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, प्राचार्य एस आर पाटील उपप्राचार्य एस पी पाटील उपमुख्याध्यापक आर जी देशमाने सुपरवायझर एस वाय बेलेकर यांचे प्रोत्साहन तर सौ. जी. व्ही. पाटील यांचे पाचवीच्या व नंदा मारुती पाटील यांचे आठवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.