ताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘मराठी पाटया’चे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं, निर्णयाबददल महाराष्ट्र सरकारचही अभिनंदन : राज ठाकरे

२००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.

मुंबई :

राज्यातील सर्व दुकानांवरील पाट्या ह्या मराठी भाषेतच असव्यात, असा निर्णय राज्य सरकारने नुकताच घेतला. पण, त्याचे श्रेय इतरांनी लाटू नये, यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्ट करून सांगितले की, “हे श्रेय फक्त आणि फक्त महाराष्ट्र सैनिकांचं आहे. बाकी कुणीही त्यांचं श्रेय लाटण्याचा आचरटपणा करू नये”, असे बोल राज ठाकरे यांनी सुनावले आहेत.

राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, “ह्या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला, आंदोलनं केली, शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या.”

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks